जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला असून त्यानुसार या निवडणुकीत महायुतीला महाविजय मिळविला आहे. जळगाव महापालिकेच्या ७५ जागांपैकी महायुतीने तब्बल ६९ जागांवर विजय मिळविला असून यामध्ये भाजप-४६, शिवसेना शिंदे गट- २२, राष्ट्रवादी अजित पवार गट-०१ जागा मिळाल्या. तर शिवसेना ठाकरे गट- ०५ जागा आणि ०१ अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. दरम्यान, जळगाव महापालिकेच्या निकालाबाबत शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे.

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शोचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहोत. मात्र अचानक उपमुख्यमंत्री शिंदे रोड शो मध्ये सहभागी होऊ शकले नाही. मात्र एकनाथ शिंदे यांनी मोबाईलद्वारे जळगावकरांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनीजळगावात महायुतीला 60 प्लस जागा मिळतील असं म्हटले होते. एकनाथ शिंदे यांच्या 60 प्लस जागांचे भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, मामा, जमलं ना?
दुसरीकडे जळगाव महापालिकेत भाजपने ४६पैकी ४६ जागा जिंकत मोठा विजय संपादन केला. या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुरेश भोळे यांना फोन लावला. ‘मामा, जमलं ना!’ अशा आपुलकीच्या स्वरात विचारत त्यांनी विजयाची विचारपूस केली.
आता महापौरपदाच्या आरक्षणाकडे लक्ष
महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे; परंतु अद्यापही शासनाने महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढलेली नाही. त्यामुळे महापौर पदाच्या खुर्चीवर कोण बसणार ? हे आरक्षणानंतरच निश्चित होणार आहे.











