भुसावळात महिलेकडून गावठी कट्टा जप्त; गुन्हा दाखल

जानेवारी 15, 2026 5:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरीछुपे पद्धतीने गावठी कट्टे (देशी बनावटीची शस्त्रे) बाळगण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असून या बेकायदेशीर शस्त्रांमुळे कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहे. अशातच भुसावळ शहरातील न्यायालयाबाहेरील सार्वजनिक रस्त्यावर संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या एका महिलेकडून गावठी कट्टा व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई भुसावळ शहर पोलिसांनी बुधवारी केली.

प्रतीकात्मक फोटो

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, न्यायालयाबाहेरील भुसावळ–यावल मार्गावरील सार्वजनिक रस्त्यावर एक महिला संशयास्पद अवस्थेत उभी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकून पंचांसमक्ष तपासणी केली. यावेळी संबंधित महिलेकडून गावठी कट्टा आढळून आला.
संबंधित महिलेचे नाव सुभमा अशोक धामणे (वय ३२, रा. तापीनगर, एमआयडीसी ऑफिससमोर, प्लॉट नं. ३, भुसावळ) असे असून तिच्याकडील मोटारसायकलचीही झडती घेण्यात आली. तपासादरम्यान अंदाजे २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व सुमारे ६० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल दीपाली रामलखन यादव यांनी फिर्याद दिली असून, संबंधित महिलेविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now