भुसावळात निवृत्त आरपीएफ कर्मचाऱ्याच्या घरातून लाखोंचा ऐवज चोरीस

जानेवारी 12, 2026 11:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरात घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक धास्तावले आहेत. अशातच रामायण नगर, कंटेनर रोड परिसरात राहणाऱ्या निवृत्त आरपीएफ कर्मचाऱ्याच्या घरातून ४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. याबाबत गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या काही तासातच बाजारपेठ पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.

chalisgaon gharfodi 44 thousand

भुसावळ शहरातील रामायण नगरातील कृष्णाकुमार मोहन पाठक हे निवृत्त आरपीएफ कर्मचारी आहे. त्यांच्या घराच्या पोर्चमध्ये ठेवलेल्या स्टूलवर चढून चोरट्यांनी गच्चीवर प्रवेश केला. नंतर गच्चीचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. नंतर सोन्याची चैन, मंगळसूत्र, कानातील बाळ्या, टॉप्स, पेंडल, नथ, चांदीचे पायल, जोडवे, अंगठी, बजाज कंपनीची इंडक्शन शेगडी व सायकल असा मुद्देमाल चोरून नेला.

त्याची एकूण किंमत सुमारे ४ लाख ३२ हजार रुपये आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ई-साक्ष (डिजिटल पुरावे) नोंदवले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक मंगेश जाधव तपास करत आहे.

सीसीटीव्हीमुळे चोरटा अटकेत
बाजारपेठ पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री १० वाजता गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहिले. यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्यात सायकल चोरीची तक्रार आली होती. सायकल घेऊन जाणारा एक व्यक्ती फुटेजमध्ये दिसताच पोलिसांनी शिवाजी नगरकडे मोर्चा वळवला. तेथून एक व्यक्ती सायकल घेऊन रात्री २ वाजता जाताना दिसला. त्याचे नाव कुंदन गोरेलाल कचवा (रा, मध्य प्रदेश, ह.मु. पंधरा बंगला, भुसावळ) असे आहे. त्याने चोरीची कबुली दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now