अरे देवा ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी दरात मोठी उसळी, नवीन दर पहा?

डिसेंबर 22, 2025 11:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२५ । मागच्या काही दिवसापासून सोने दरात चढ उतार कायम असून आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याचं दिसून आले. आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,१०० रुपयांनी वाढले आहेत. चांदी दरातही मोठी वाढ झालीय. चांदीचा दर प्रति किलो ५ हजार रुपयांनी वाढला आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.

gold silver 1 jpg webp

काय आहे सोन्याचे दर?

आज २४ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे १,१०० रुपयांनी वाढले असून हे दर १,३५,२८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ८८० रुपयांनी वाढले असून हे दर १,०८,२२४ रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १००० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२४,००० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ८०० रुपयांनी वाढले असून ९९,२०० रुपये झाले आहेत. तर १० तोळ्याचे दर १२,४०,००० रुपये झाले आहेत. हे दर १०,००० रुपयांनी वाढले आहेत.

चांदीत मोठी उसळी

सोन्यापाठोपाठ चांदी दरात तब्बल ५००० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे आता चांदीचा एक किलोचा दर १,१९,००० रुपयांवर पोहोचला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now