राज्यात आचारसंहिता लागू; ३१ डिसेंबरला पार्टीचा प्लॅन करण्याआधी ही बातमी वाचा, अन्यथा..

डिसेंबर 16, 2025 11:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२५ । महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु असून नुकतेच राज्यातील बहुप्रतिक्षित महानगर पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. निवडणुक आयोगाने १५ डिसेंबर रोजी राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून या घोषणेसोबतच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. अशातच ३१ डिसेंबर अवघ्या दोन आठवड्यावर आलाय. जर तुम्हीही ३१ डिसेंबर निमित्त ढाबा, हॉटेल, रिसॉर्टवर जाण्याचे बेत आखले असेल तर थांबा.. अन्यथा ३१ डिसेंबरच्या पार्टीदरम्यान अवैध मद्यविक्री आणि मद्यपान केल्यास ढाबा चालक व मद्यपींवर कठोर कारवाई होऊ शकते.

31december

खरंतर वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच ३१ डिसेंबर हा दिवस अनेकजण जंगी सेलिब्रिशेन करतात. पण यंदा निवडणुका असल्यामुळे कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. निवडणुका अन् ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ढाब्यांवरील पार्टी, अवैध मद्यविक्री, वाहतूक, साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष आहे.

३१ डिसेंबर रोजी पार्टी करण्याआधी मद्यपींनी दारू पिण्याचा परवानगी काढवी. कारण, अवैध मद्यविक्री अन् मद्यप्राशन करणाऱ्यांविरोत गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. त्यामुळे ढाबा अन् इतर ठिकाणी दारू पार्टी कऱण्याआधी दहा वेळा विचार करा, कचाट्यात सापडल्यास मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल. हॉटेल अथवा ढाब्यांवर कोणी मद्यविक्री करून मद्यपींची सोय करीत असल्यास कारवाई होईल. हॉटेल, ढाबा मालक आणि मद्यपींवरही गुन्हे दाखल केले जातील.

नियमांनुसार, परमीट बार सोडून इतर ठिकाणी परवानगी नसताना मद्यविक्री, मद्यपान करता येत नाही. पण अनेकदा राष्ट्रीय महामार्गावरील ढाबे, हॉटेलवर मद्यपींसाठी अवैध दारूची सोय करून दिली जाते. पुणे ग्रामीण, सोलापूर, ठाणे, नाशिकसह सोलापूरमध्येही अनेक बिअर शॉपी, हॉटेलमध्ये देखील असेच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता संबंधित ढाबा हॉटेल चालक व तेथील मद्यपींवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. या प्रकरणात त्या व्यक्तीला अटकही होऊ शकते.

परवानगी नसताना मद्यविक्री केली तर दारूबंदी न्यायालयात ढाबा चालकास पाच ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तर मद्यपीस एक ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जातो. त्यामुळे ३१ डिसेंबरला पार्टी अथवा सेलीब्रेशन करण्याचा विचार करत असताल तर मद्यपींनी एक रुपयात ऑनलाइन परवाना काढून घ्यावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now