भुसावळसह जळगाव मार्गे आणखी दोन नवीन विशेष एक्स्प्रेस धावणार

डिसेंबर 13, 2025 9:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळसह जळगाव मार्गे आणखी दोन नवीन रेल्वे गाड्या धावणार आहे. रेल्वेला प्रवाशांची होत असलेली गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने मुंबई ते हावडा आणि मुंबई ते नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्या ऑन डिमांड स्पेशल म्हणून नियोजित आहे.

train

मुंबई-हावडा (०२८६९) विशेष गाडी

मुंबई-हावडा (०२८६९) ही विशेष गाडी मुंबई येथून १३ डिसेंबरला सकाळी ११.०५ वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी हावडा येथे रात्री ८.५५ वाजता येईल. हावडा- मुंबई विशेष गाडी (०२८७०) हावडा येथून ११ डिसेंबरला दुपारी १.५५ वाजता सुटली आहे. ती दुसऱ्या दिवशी मुंबईत रात्री ११.४५ वाजता येईल.

थांबे : या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, राउलकेला, टाटा नगर आणि खरगपूर येथे थांबा आहे.

मुंबई-नागपूर ही विशेष गाडी १५ डिसेंबरला दुपारी ३.३० वाजता मुंबईतून सुटेल व नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता येईल. तसेच नागपूर-मुंबई (०१०१२) ही गाडी १४ डिसेंबरला नागपूर येथून रात्री १०.१० वाजता सुटेल. ती मुंबईत दुसऱ्या दिवशी २.०५ वाजता येईल.

थांबे : ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपूरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे थांबेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now