धुळ्यातील भीषण अपघातात जळगावच्या दोघांचा मृत्यू

डिसेंबर 12, 2025 11:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । धुळ्यात झालेल्या भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेलया दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ११ डिसेंबर रोजी घडली. फागणे गावानजीक ही घटना घडली.

accident jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याकडून जळगावकडे जात असताना फागणे गावापुढे भरधाव अज्ञात वाहनाने एमएच १९ सीई १७१९ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दीपक मोतीलाल भामरे (वय ४५) व पन्नालाल भगवान वर्मा (दोघे रा. जळगाव) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी तातडीने धाव घेत दोघांनाही शवविच्छेदनासाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय रुग्णालयात हलवले. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now