जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहराच्या बाहेरून गेलेल्या पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात झाला. यात इको कारचे टायर फुटून पलटी मारून ती समोरून येणाऱ्या कंटेनरवर आदळली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले.

बायपासवर तरसोद फाट्याकडून पाळधीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचे (क्र. एमएच १९, ईजी १८७८) टायर फुटले. त्यानंतर ते दुसऱ्या बाजूने पाळधीकडून तरसोदकडे जाणाऱ्या एका ट्रेलरच्या (क्र. सीजे ०७, बीआर ३७१७) डिझेल टॅकवर धडकले. यात वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला.

यात यश रमेश शिंपी (वय २३, रा. पाळधी) व पल्लवी छाडीकर (वय २०, रा. मेहरूण) हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांच्याही हाताला गंभीर दुखापत झाली असून तरुणाच्या पायालाही मार लागला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी सांगितले.
जखमी यशच्या पायाला व डोक्याला जबर दुखापत झाली आहे. त्याचे सीटी स्कॅन करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले.











