गुन्हेजळगाव शहर

जळगावात बंद घर फोडून ५२ हजाराचा ऐवज लांबविला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । बंद घराचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी घरातून ५२ हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी जळगाव एमआयडीसी परिसरातील रामनगर मध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की,  फेब्रिकेशनचे काम करणारे शेख सद्दाम अब्दुल वहाब (वय 28)  हे रामनगर मेहरूण, जळगाव येथे पत्नी आयशाबी शेख सद्दाम हिच्यासह भाड्याने राहतात. घरासमोरच त्यांचे सासरे शेख कलीम शेख वजीर हे देखील समोर राहतात. शेख सद्दाम अब्दुल वहाब यांची बहीण नसीमबी सलिम शेख  ही सुमारे 1 महिन्यापासून आली होती तिचे दागिने व पैसे असलेली कापडी पिशवी तिने कपाटात ठेवण्यासाठी दिली होती.

१७ रोजी आयशा ही घरी एकटीच होती. ती देखील दुपारी २ वाजता घराला कुलुप लावुन घरासमोर राहणाऱ्या शेख कलीम शेख वजीर यांचेकडे बसायला गेली होती.सायंकाळी शेख सद्दाम घरी आलो तेव्हा घराला लावलेले कुलुप तुटून घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. 

अज्ञात व्यक्तीने ३०हजार रु.रोख रक्‍कम १२ हजारांचे ४ ग्रँम कानातील रिंग १० हजार किंमतीची ५ ग्रँम गळ्यातील पांचाली असा एकूण ५२ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button