जामनेरातील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेच्या चेअरमनच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

नोव्हेंबर 10, 2025 4:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२५ । जामनेर येथील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांनी विषप्राशन केल्याची चर्चा असून या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

Rajkumar Kavadia

काही महिन्यापूर्वीच जामनेर मधील पळसखेडा बुद्रुक शिवारात प्रकाशचंद्र जैन संस्थेच्या आयुर्वेदिक फिजिओथेरपी व होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी रद्द करण्यात आली होती. या महाविद्यालयाची इमारत प्रशासनाकडून अतिक्रमणात असल्याचं सांगण्यात आलं होतं.

उद्या म्हणजे मंगळवारी इमारतीचं बांधकाम पाडण्यात येणार होते. मात्र, त्याआधीच संस्थाचालक राजकुमार कावडीया यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांनी विषप्राशन केल्याची चर्चा असून या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळताच पत्नी आणि मुलाने हॉस्पिटलमध्येच हंबरडा फोडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, मृत्यूपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिल्याची चर्चा आहे, मात्र याबाबत पोलिसांकडून किंवा कुटुंबीयांकडून अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. कावडिया यांच्या मृत्यूनंतर विविध तर्कवितर्कांना ऊत आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now