जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे शिवारात बिबट्याने एका वासरूचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शेतकरी सकाळी शेतात गेले असता ही घटना उघडकीस आली.

वरखेडे शिवारात राजेंद्र भिमसिंग कच्छवा यांचे शेत असून या शेताच्या शेडमध्ये पाच ते सहा दुधाळ गुरे बांधलेली असतात. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कच्छवा हे गुरंाना चारापाणी करण्यासाठी शेतात गेले असता एक वासरू बिबट्याने फस्त केल्याचे आढळून आले. तसेच काही शेतकऱ्यंाना या बिबट्याचे दर्शन घडले. वाहनांच्या आवाजाने बिबट्याने अज्ञात स्थळी धूम ठोकली.

या घटनेने शेतकरी भयभीत झाले आहेत. त्यंानी घटनेची माहिती वन विभागाला दिली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे बसवले.
अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या महिन्याभरापासून या भागात बिबट्याचा वावर असून शेतकऱ्यांना त्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा. वन विभागाने याबाबत कार्यवाही न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला. २०१७ मध्ये गावातील तीन महिलांचा बळी बिबट्याने घेतला होता.या भागात बिबट्याचा नेहमी वावर असतो. त्यामुळे वरखेडे गाव नेहमी बिबट्याच्या दहशतीमध्ये असते.











