गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक

ऑक्टोबर 24, 2025 5:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२५ । जळगाव जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रांच्या विरोधात पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात असल्याचे दिसून येत असून अशातच जळगाव शहर पोलिसांनी शिताफीने एकाला ताब्यात घेत त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

gun fire

बिग बाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोस्ती बिअर शॉपसमोर एक संशयित इसम विनापरवाना पिस्तूल बाळगून असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर शिंपी यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तात्काळ सापळा रचला आणि संशयितास ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या व्यक्तीने चौकशीत आपले नाव हर्षल जितेंद्र कदम (वय २८, रा. मकरा टॉवर, जळगाव) असे सांगितले.

पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल (सिल्व्हर रंगाचे, मॅगझीनसह) किंमत अंदाजे १५,००० रुपये, जिवंत काडतूस किंमत अंदाजे ५०० रुपये अवैध शस्त्र आढळले. याप्रकरणी पोलिसांनी १५,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस कॉन्स्टेबल अमोल अशोक ठाकूर यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिपक सुरवळकर करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now