जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२५ । जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली झाली आहे. आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली झाली असून त्यांच्या जागी आता रोहन घुगे हे नवीन जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेणार. याबाबतचे आदेश आज निर्गमीत करण्यात आले आहेत.

राज्य सरकारकडून आज (दि.०७) १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS Officer Transfer) केल्या आहेत. यामध्ये सध्या जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे पदभार घेणार आहे.









