जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । काल बुधवारी सोन्याचा भाव स्थिर राहिल्यानंतर आज सोनं स्वस्त झालं आहे. आज सोन्याच्या भावात प्रति १० ग्रम १६० रुपयाची घसरण झाली आहे. तर काल चांदी स्वस्त झाल्यानंतर आज पुन्हा महागली आहे. आज चांदीच्या दरात ३०० रुपयाची वाढ झाली आहे.
कोरोना लॉकडाऊन मध्ये काही अंशी सूट मिळताच सोने आणि चांदीच्या भावात मोठी हालचाली दिसून आल्या. मागील काही दिवसापासून दोन्ही धातूंमध्ये चढ-उतार दिसून आला आहे. यामुळे दररोज सोनेआणि चांदीच्या दरात बदल होतानाचे दिसून येत आहे.
आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८९१ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,९१० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६५८ रुपये इतका आहे. तर १० ग्रमसाठी तुम्हाला ४६,५८० रुपये मोजावे लागतील.
चांदीचा भाव
तर चांदीत आज वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज चांदीच्या भावात ३०० रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव ७६,२०० रुपये आहे.