दसऱ्यापूर्वी महागाईचा झटका; LPG सिलिंडरच्या किमतीत ‘इतक्या’ रुपयांची वाढ, आजपासून नवीन दर लागू

ऑक्टोबर 1, 2025 11:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२५ । ऑक्टोबर महिना सणासुदीचा असून या महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा फटका बसला आहे.देशभरातील एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १६ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर आजपासून लागू झाले आहे. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत करण्यात आली असून १४ किलोच्या घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीय.

gas

दिल्लीमध्ये, १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता १५९५.५० रुपये होईल, जी सप्टेंबरमध्ये १५८० रुपयांपर्यंत कमी झाली होती, म्हणजेच १५.५० रुपयांनी वाढली आहे. कोलकातामध्ये, सिलिंडरची किंमत आता १७०० रुपये होईल, जी सप्टेंबरमध्ये १६८४ रुपये होती, म्हणजेच १६ रुपयांनी वाढली आहे. मुंबईत त्याची किंमत सप्टेंबरमधील १५३१.५० रुपयांवरून वाढ होऊन आता १५४७ रुपये होईल. चेन्नईमध्ये, सिलिंडरची किंमत आता १७५४ रुपये होईल, जी सप्टेंबरमध्ये १७३८ रुपयांपर्यंत कमी झाली होती, म्हणजेच १६ रुपयांनी वाढली आहे.

सणासुदीत व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले असले तरी, घरगुती गॅसचे दर मात्र ‘जैसे थे’ आहेत. याचा अर्थ सामान्य ग्राहकांना दिलासा आहे. त्यापूर्वी १ ऑगस्ट रोजी ते ३३.५० रुपयांनी स्वस्त झाले होते. जुलै २०२५ च्या पहिल्या तारखेलाही १९ किलोच्या सिलिंडरचा दर ५८ रुपयांपर्यंत कमी झाला होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now