ग्राहकांसाठी गुडन्यूज ! सोने दरात मोठी घसरण.. आता जळगावमध्ये १ तोळ्याचा दर काय?

सप्टेंबर 25, 2025 11:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२५ । जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सततच्या दरवाढीने सोने दराचे रोज नवे उच्चांक निर्माण होत आहेत. यामुळे ऐन नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर खरेदीकर्त्यांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. दरम्यान सोन्यातील दरवाढीला ब्रेक लागला आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आज गुरुवारी सकाळी बाजार उघडताच सोने दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाली आहे. दरम्यान दुसरीकडे आज चांदीचा दर स्थिर आहे. तुम्हीही आज सोनं-चांदी खरेदी करायला जाणार असाल तर त्यापूर्वी आताचे दर किती आहेत ते वाचा सविस्तर…

gold

काय आहे सोन्याचे नवीन दर?

जळगाव सराफ बाजारात आज (दि २५ सप्टेंबर) सकाळी बाजार उघडताच २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ११०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला एक लाख १३ हजार २०० रुपये मोजावे लागणार आहे. तर जीएसटीसह एक लाख १६ हजार ५९६ रुपये मोजावे लागणार. त्याचसोबत आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १००० रुपयांची घसरण होऊन ते एक लाख ३ हजार ६९० रुपयांवर पोहोचले. तर जीएसटी हा दर एक लाख ६ हजार ८०० रुपये इतका आहे.

दरम्यान दुसरीकडे चांदीचा दर मागच्या तीन दिवसापासून स्थिर दिसून आला आहे. आज चांदीत कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आली नाही. सध्या एक किलो चांदीचा दर १ लाख ३६ हजार रुपये (जीएसटी १४००८०) इतका आहे.

दर घसरले असले तरी सणासुदीचा माहोल, आगामी दिवाळी आणि लग्नसराई लक्षात घेता खरेदीची लगबग बाजारपेठेत सुरूच आहे. पारंपरिकरीत्या या हंगामात सोनं-चांदी खरेदी शुभ मानली जाते, त्यामुळे ग्राहक दालनांकडे आकर्षित होत आहेत. भंगाळे गोल्डमध्ये उत्सवी ऑफर्स, आकर्षक योजना, पारंपरिक व आधुनिक डिझाईन्स आणि शुद्धतेची हमी यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. जळगाव आणि सावदा येथील दालनांमध्ये रोजच खरेदीदारांची गर्दी दिसून येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now