आजचा सोने-चांदीचा नवीन दर जाहीर ; जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेमध्ये एका तोळ्याचा दर काय?

सप्टेंबर 24, 2025 1:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२५ । मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात सातत्याने वाढ दिसून येत आहे. ज्यामुळे जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दोन्ही धातूंनी नवीन विक्रमी पातळी गाठली असून ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये त्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान आज बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोने दरात वाढ दिसून आली. तर चांदीचा दर स्थिर आहे. आज सकाळी चांदी दरात वाढ किंवा घटही झालेली नाही. तुम्हीही सराफ बाजारात सोने-चांदी खरेदीला जाणार असाल तर त्यापूर्वी नवीन दर काय आहेत? ते जाणून घ्या..

GS24 Sep

खरंतर एन सणासुदीच्या दिवसांवर सोन्यासह चांदीची किंमत धडाधड वाढत असल्याने ग्राहकांना धडकी बसली आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपात आणि अजून या वर्षाअखेरीस व्याजदर कपातीचे संकेत यामुळे गुंतवणूकदार सोने-चांदीकडे वळाले आहेत. मागणी आणि पुरवठ्यातील व्यस्त प्रमाणामुळे किंमती भडकल्या आहेत. व्याज दर कमी झाल्याचे परिणाम थेट डॉलर आणि बाँडवर दिसत आहे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून या दोन्ही धातुकडे वळल्याने किंमती सातत्याने वाढत आहेत.

काय आहे सोन्याचा दर?

जळगाव सराफ बाजारात आज बुधवारी सकाळी बाजार उघडताच २४ कॅरेट सोने दरात प्रति तोळा २०० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याच्या दर जीएसटीविना एक लाख १४ हजार ५०० रुपयांवर पोहोचला. तसेच २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४ हजार ८८० रुपये प्रति तोळा आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला २४ कॅरेट सोन्याचा दर एक लाख आठ हजार ५०० रूपयांपर्यंत होते. दरवाढ सुरूच राहिल्याने तीन आठवड्याच्या कालावधीत सोन्याच्या किमतीत तब्बल ९ हजार रुपयापर्यंतची वाढ झाली

चांदीचा नवीन दर

आज चांदीचा दर स्थिर आहे. सध्या एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी १ लाख ३६ हजार रुपये इतका आहे. दरम्यान मागच्या दोनदिवसात चांदीच्या किमती मोठी वाढ नोंदविण्यात आल्याने जळगावमध्ये प्रथमच चांदीने एक लाख ३६ हजारपर्यंतची उच्चांकी मजल मारली. दरम्यान सध्या वाढलेल्या सोने-चांदी दरांमुळे अनेक ग्राहक जुने दागिने बदलून नवीन नक्षीचे दागिने घेण्याला प्राधान्य देऊ शकतात. सराफांच्या मते, दर कितीही जास्त असले तरी विक्रीचे एकूण मूल्य वाढणारच आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now