दुर्दैवी! रावेरात विज पडून तरुण मेंढपाळाचा मृत्यू

ऑगस्ट 29, 2025 1:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. यातच रात्री विज पडल्याने तरुण मेंढपाळाचा मृत्यू झाल्याची घटना रावेर तालुक्यातील मुंजलवाडी शिवारात घडली. विज पडून दादा कोळपे (वय २०, रा. लालमाती पाड्या) असं मृत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

vij jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे आठच्या सुमारास रावेर तालुक्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची सुरूवात झाली. याच दरम्यान दादा कोळपे हे आपल्या कुटुंबासह पाड्यावर थांबले होते. अचानक विज पडल्याने ते जागेवरच कोसळले. त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तर यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.या घटनेनंतर कोळपे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच बाळा आमोदकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांच्या टीमने मृतकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now