जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२५ । जळगाव विमानसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच जळगावहून सुरू असलेली अहमदाबाद विमानसेवा दि. ३१ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणीमुळे ही विमानसेवा रद्द करण्यात आल्याची माहिती असून यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

सध्या जळगाव विमानतळावरून पुणे, गोवा, हैद्राबाद साठी विमानसेवा सुरु आहे. या विमानसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. तर जळगाव विमानतळावरून अलायन्स एअर विमान कंपनीकडून मुंबई आणि अहमदाबादसाठी सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र यातच जळगावहून सुरू असलेली अहमदाबाद सेवा दि. ३१ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

विमान आणि विमान वाहतूक क्षेत्राला आवश्यक असलेल्या सुविधा, उपकरणे, तंत्रज्ञान, तांत्रिक कमतरतेमुळे अहमदाबाद सेवा ३१ ऑगस्टपर्यंत रद्द असल्याची माहिती सूत्रांनी दिली.












