युवा फिल्म मेकर्स करिता शॉर्ट फिल्म निर्मितीसाठी ‘योफिमा’ युवा शिष्यवृत्तीचा शुभारंभ

ऑगस्ट 11, 2025 6:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आजच्या युगात रील्स आणि शॉर्ट फिल्म निर्मिती क्षेत्रात युवा वर्गाचे मोठे योगदान आहे. ह्याच युवा वर्गाच्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळावं यासाठी अजिंठा फिल्म सोसायटी खान्देश व मराठवाडा भागातील तरुण चित्रकर्मींसाठी योफिमा शिष्यवृत्ती अर्थात ‘यंग फिल्म मेकर फेलोशिप’ सलग दुसऱ्या वर्षी घेऊन येत आहे. या योजनेचा शुभारंभ आज जळगाव येथे करण्यात आला.

yofima

सुप्रसिद्ध अभिनेता,लेखक ,दिग्दर्शक प्रा. योगेश सोमण या योफिमा (YOFIMA) योजनेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत.

मराठवाडा व खान्देश परिक्षेत्रात चित्रपट निर्मितीसाठी ची सर्जनशीलता असूनही अनेक तरुण चित्रकर्मींना आर्थिक मदती अभावी आपली सर्जनशीलता व कलाकृती जगासमोर मांडता येत नाही अशा लघुपट निर्माते किंवा युवा चित्रकर्मींना आपली कला जगासमोर मांडता यावी यासाठी अजिंठा फिल्म सोसायटी खान्देश व मराठवाडा भागातील तरुण चित्रकर्मींसाठी योफिमा शिष्यवृत्ती अर्थात यंग फिल्म मेकर फेलोशिप प्रोग्राम योजना यावर्षी देखील आयोजित करत आहे. या योजनेत खान्देश व मराठवाडा भागातील म्हणजेच जळगाव, धुळे,नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर,जालना,परभणी,हिंगोली, नांदेड, लातूर, इ.जिल्ह्यातील १८ ते ३० वयोगटातील प्रतिभावान युवा चित्रकर्मींना सहभागी होता येणार आहे. योजनेत नोंदणी झालेल्या युवा चित्रकर्मींपैकी निवड समितीतर्फे निवड झालेल्या सर्वोत्कृष्ट ६ कलाकृतींच्या निर्मिती साठी प्रत्येकी रु २५०००/- इतकी शिष्यवृत्ती रक्कम मिळणार आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या प्रत्येक युवा फिल्म मेकर्स ना लघुपट निर्मिती साठी आवश्यक मार्गदर्शन तसेच कथा निवड, लेखन, दिग्दर्शन, पोस्ट प्रोडक्शन इ.विषयांच्या कार्यशाळेत मोफत सहभागी होता येणार आहे. या सर्व कार्यशाळांमध्ये चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज लेखन, दिग्दर्शक, कलावंत मार्गदर्शन करणार आहेत.या योजनेत सहभागी होण्यासाठी दि.१० सप्टेंबर २०२५ पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

image

या योजनेचा शुभारंभ सोहळा दि.११ ऑगस्ट २०२५ रोजी जळगावातील नुतन मराठा महाविद्यालय येथे मान्यवरांच्या हस्ते YoFiMa चे पोस्टर विमोचन करुन उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, अजिंठा फिल्म सोसायटीचे उपाध्यक्ष अनिल भोळे सचिव विनीत जोशी, कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे,सदस्य पियुषभाई रावळ, देवगिरी चित्र साधना चे प्रांत संयोजक किरण सोहळे, प्रसार माध्यम प्रमुख रजत भोळे, निर्मिती प्रमुख पार्थ ठाकर,रंगकर्मी हनुमान सुरवसे इ.मान्यवर उपस्थित होते. अजिंठा फिल्म सोसायटीच्या वतीने किरण सोहळे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजत भोळे यांनी केले तर पार्थ ठाकर यांनी मान्यवरांचे आभार मानले.

या योजनेचा अधिकाधिक युवा चित्रकर्मींनी लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी : 9309264429 – 9892906374 -7057344411
[email protected] वर संपर्क साधावा असे आवाहन योफिमा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.योगेश सोमण, डॉ.जयंत शेवतेकर,डॉ.जयेंद्र लेकुरवाळे,डॉ.अनुराधा पत्की, डॉ.सुचित्रा लोंढे,डॉ.श्रद्धा शुक्ल यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now