Jalgaon : उत्तरकाशी दुर्घटनेत पाचोऱ्याचा जवान बेपत्ता, जिल्ह्यातील 16 भाविकांशी संपर्क होईना, तीनजण सुखरूप

ऑगस्ट 6, 2025 6:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२५ । उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली इथे पाऊस व ढगफुटी झाल्याने खीरगंगा नदीला मोठा पूर आला व अनेक घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाळले गेले. यात अनेक जण बेपत्ता झाले आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील एकूण 19 भाविक अडकल्याची माहिती समोर आली असून यापैकी पाचोरा येथील एक जवान बेपत्ता आहे. जळगाव शहरातील तीन भाविक सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तर उर्वरित 16 जणांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नसल्याची माहिती आहे .

SBI Clerk Bharti 2

उत्तरकाशी जिल्ह्यामधील धराली गावात आलेल्या महाप्रलयात 4 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे आणि या दुर्घटनेत अनेक लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांचा अद्याप शोध सुरु आहे. यातच काशीला दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यातून देखील अनेक भाविक गेले आहेत. या घटनेनंतर दर्शनासाठी गेलेल्या भाविकांशी संपर्क होऊ शकत नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत.

पाचोरा येथील जवान बेपत्ता

दरम्यान उत्तराखंड दुर्घटनेत जळगाव शहरातील आयोध्यानगर येथील तीन भाविक सुरक्षित असल्याची माहिती आहे. मेहरा कुटुंबातील अनामिका मेहरा, आरोही मेहरा, रुपेश मेहरा हे सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र पाचोरा येथील एक जवान बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पाचोऱ्यातील येथील हर्षल गावात कर्तव्यावर असताना बेपत्ता झाले आहेत. त्याच्याशी संपर्क होत नसल्यामुळे परिवार चिंतेत सापडला आहे.

त्याचप्रमाणे धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील तेरा तरुणांचा देखील संपर्क होत नसल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये रोहन दिनेश माळी, रोहित बंडू माळी, मनोज संजय चौधरी, ज्ञानेश्वर संजय माळी, दीपक रत्नाकर सोनार, सगदीक नन्नवरे, दीपक माळी, वैभव गंगवणे, संदीप माळी, विशाल पाटील (सुरत), राकेश माळी, भूषण माळी व पवन यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. तसेच

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now