जळगावी न थांबणाऱ्या धावत्या ट्रेनमधून उतरणे जीवावर बेतले; वकील महिलेचा मृत्यू

ऑगस्ट 3, 2025 8:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात रेल्वे स्थानकावर थांबा नसलेल्या मंगला एक्स्प्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न करताना जखमी झालेल्या वकील महिलेचा मृत्यू झाला. वर्षा साहेबराव बिऱ्हाडे असं मयत वकील महिलेचं नाव आहे.

jalgaon railway station jpg webp

याबाबत असे की, जळगाव शहरातील भोईटे नगरात राहणाऱ्या अॅड. वर्षा बिऱ्हाडे या जळगाव व कल्याण येथे वकिलीचा व्यवसाय करत होत्या. त्या गुरुवारी मुंबईहून मंगला एक्स्प्रेसने येत होत्या. या रेल्वेला जळगावला थांबा नसल्याने ती जळगाव स्थानकावरून हळू जात असताना काही प्रवासी चालत्या रेल्वेतून उतरले.

त्यांचे पाहून अॅड. बिऱ्हाडे या उतरत असताना त्यांचा तोल जाऊन त्या फलाट तीनवर डोक्यावर पडल्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या मेंदूत अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now