जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांकडून खरीप पिकांना रासायनिक खते देण्याची लगबग सुरू असून मात्र यातच अमळनेर किरकोळ कारणावरून अमळनेर येथे कृषी केंद्रावर कारवाई होत असल्याने जोपर्यंत रासायनिक खतांमधील युरिया खत २६६ रुपये किमतीच्या खाली कृषी केंद्रांना मिळत नाही, तोपर्यंत नवीन खत खरेदी न करण्याचा निर्णय जळगाव डिस्ट्रीक्ट फर्टिलायझर, पैस्टीसाईडस व सिड्स डिलर्स असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

तसा ठरावही करण्यात आला आहे. तो कृषी विकास अधिकारी यांनाही पाठवण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष विनोद तराळ, उपाध्यक्ष प्रफुल्ल बांठीया, सचिव कैलास मालू, सहसचिव राजेंद्र पाटील, खजिनदार शैलेश काबरा व अन्य कृषी केंद्र चालक बैठकीला उपस्थित होते.

जळगाव जिल्हा असोसिएशनची तातडीची बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व कृषी व्यावसायिकांना जोपर्यंत युरिया खत २६६ च्या आत उपलब्ध होत नाही तोपर्यंत युरिया खरेदी बंदचा ठराव घेण्यात आला. जो पर्यन्त युरिया खताची आधारभूत किमतीपेक्षा कमी व कोणत्याही युरिया खत शासन निर्णयानुसार पोहोच स्वरूपात मिळणार नाही तो पर्यंत कोणीही युरिया खत खरेदी करणार नाही. आता पर्यंत आम्ही एक्स भाडे लावून आलेले खत विक्री करीत होते. तो युरिया आम्हाला एमआरपी पेक्षा जास्त भावात येत असल्याने आम्हालाही विक्री करीत असतांना शेतकरी तसेच अधिकारी यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. असे केंद्र चालकांनी सांगितले.








