Jalgaon : 10वीच्या विद्यार्थ्यानं उचललं नको ते पाऊल; रायपूर कुसुंबामध्ये खळबळ

ऑगस्ट 2, 2025 3:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२५ । अल्पवयीन मुलांमध्ये आत्म$## हत्या सारख्या घटना वाढताना दिसून असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशातच दहावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरात गळ$## फास घेऊन आत्म$## हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथे समोर आलीय. वैभव रवींद्र ठाकूर (वय १६, रा. रायपूर कुसुंबा, ता. जळगाव) असे आत्म$## हत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून वैभवने इतकं मोठं टोकाचं पाऊल का उचलल याबाबत कळू शकलं नाही.

crime 2022 06 20T155553.090 jpg webp

याबाबत थोडक्यात असे की, रायपूरचा राहणार वैभव हा कुसुंबा येथील श्री स्वामी समर्थ संस्थेच्या विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता. मात्र त्याने १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घरी कोणी नसताना वैभवने राहत्या घरी दोरीने गळ$## फास घेतला. त्याची आई आणि भाऊ घरी परतल्यानंतर त्यांना ही हृदयद्रावक घटना दिसली. या घटनेने त्यांनी मोठा आक्रोश केला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तातडीने वैभवला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

रुग्णालयात वैभवच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. या घटनेमुळे संपूर्ण रायपूर कुसुंबा गावात हळहळ व्यक्त होत आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील खाजगी चालक म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now