धक्कादायक । जळगावातील माजी नगरसेवक अनंत(बंटी) जोशींनी उचलले टोकाचे पाऊल

ऑगस्ट 1, 2025 9:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२५ । जळगाव शहर महानगरपालिकेतील माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी वय-५० यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी आज शुक्रवार दि.१ ऑगस्ट रोजी आपल्या जयनगर परिसरातील राहत्या घरी गळ#₹ फास घेऊन जीवन#₹यात्रा संपविली. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली.

anant joshi

दरम्यान, अनंत उर्फ बंटी जोशी यांनी इतकं मोठं टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत कळू शकलं नसून या घटनेची माहिती कळताच समाजातील मान्यवर आणि मित्रांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. आज सायंकाळी ७.३० च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान बंटी जोशी हे जळगाव मनपातील अभ्यासू नगरसेवक, हसत खेळत व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवारने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली होती. जिल्हा रुग्णालयात माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णु भंगाळे, सुनील महाजन, शरद तायडे, सुनील झंवर, शामकांत सोनवणे, आयुष मणियार, पीयूष कोल्हे, पीयूष मणियार, सरिता माळी, कैलास आप्पा सोनवणे, कुंदन काळे, गणेश सोनवणे, जमील देशपांडे, प्रवीण कोल्हे यांच्यासह मित्र परिवार जमला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now