जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगावात धुळ्याच्या एसीबीने मोठी कारवाई केली. जिथे डिलोपार्जित शेत जमिनीच्या सातबारा उतार्यावरील ईतर हक्कातील जुनी कालबाह्य नोंद कमी करण्यासाठी 25 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना चाळीसगावातील महिला तलाठी व रोजगार सेवकासह तिघांना रंगेहात अटक करण्यात आली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली.

मोमीन दिलशाद अब्दुल रहिम (वय 29 रा.प्लॉट नंबर 9, हरी ओम नगर, चाळीसगाव) असं लाचखोर महिला तलाठीचे नाव आहे. तर तलाठीसह रोजगार सेवक वडिलाल रोहिदास पवार (40, मु.पो. लोंजे, ता.चाळीसगाव) व दादा बाबू जाधव (40 , रा.मु.पो.लोंजे, ता.चाळीसगाव) या तिघांना अटक करण्यात आली असून चाळीसगाव शहर पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमका प्रकार काय?
35 वर्षीय तक्रारदाराचे वडील व इतर सात यांच्या मौजे पाथरजे, ता.चाळीसगाव येथे वडिलोपार्जित शेत-जमिनीच्या 7/12 उतार्यावरील ईतर हक्कातील जुनी कालबाह्य नोंद कमी होण्यासाठी त्यांच्या वडिलांनी केलेला अर्ज घेऊन तलाठी मोमीन यांची त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली असता त्यांनी रोजगार सेवक पवार यांना भेटण्यास सांगितले व त्यांनी देखील तुमचे काम करून देते, लाचेची अपेक्षा व्यक्त केली व 3 रोजी तक्रार दाखल करण्यात आली.
त्यानंतर 14 रोजी तक्रारदाराने रोजगार सेवकाची भेट घेतल्यानंतर त्यांनी तलाठी यांना कामाबाबत उद्या सांगते, असे सांगितले व 17 रोजी तक्रारदाराने रेाजगार सेवकाची भेट घेतल्यानंतर आरोपी तलाठी यांनी काम करून देण्याच्या मोबदल्यात 25 हजार रुपये घेण्याबाबत सांगितले. यावेळी आरोपी दादा जाधव यांनी लाच देण्यासाठी अपप्रेरणा देऊन प्रोत्साहित केले. 30 रोजी सापळा रचल्यानंतर आरोपी रोजगार सेवक पवार यांना तलाठी कार्यालयाबाहेर लाच स्वीकारताच अटक करण्यात आली व नंतर तलाठी व खाजगी पंटराला बेड्या ठोकण्यात आल्या व त्यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले.












