Jalgaon : ज्वारी, मका, बाजरी खरेदीकरिता मुदतवाढ, शेवटची तारीख घ्या जाणून?

जुलै 9, 2025 2:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२५ । शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 मध्ये ज्वारी, मका व बाजरी या भरडधान्यांची खरेदी करण्यात येणार आहे.

jwari maka

जळगांव जिल्ह्यात पणन महासंघामार्फत अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगांव, एरंडोल, पाळधी, म्हसावद, जळगांव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगांव व चाळीसगांव असे एकूण 18 खरेदी केंद्र कार्यरत राहणार आहेत. भरडधान्य ज्वारी, मका, बाजरी खरेदीकरिता आता 20 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

रब्बी हंगामातील हमीभाव पुढीलप्रमाणे आहेत :
ज्वारी : रुपये ३३७१/- प्रति क्विंटल
मका : रुपये २२२५/- प्रति क्विंटल
बाजरी : रुपये २६२५/- प्रति क्विंटल

तरी शेतकरी बंधुंनी ज्वारी, मका व बाजरी खरेदीचा लाभ घ्यावा. असे आवाहन मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय संचालक संजय वामनराव सावकारे,महाराष्ट्र राज्य पणन महासंघ लि. चे उपाध्यक्ष रोहित निकम, संचालक संजय मुरलीधर पवार व एस. एस. मेने (प्र.जिल्हा पणन अधिकारी, जळगांव) यांच्या वतीने करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now