मिरज-नागपूर एकेरी विशेष गाडी धावणार ; जळगावातील प्रवाशांना दिलासा

जून 28, 2025 5:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२८ । पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढीएकादशी वारीत सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने दिनांक १ ते १० जुलै या कालावधीत मिरज – नागपूर मार्गावर एकेरी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मध्य रेल्वेने ८३ आषाढी विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. त्यात या गाडीची भर पडणार आहे. विशेष या गाडीला जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा असल्याने जिल्ह्यातील वारकऱ्यांची सोय झाली आहे.

train

मिरज – नागपूर एकेरी विशेष (क्र. ०१२१३) गाडी ८ जुलै रोजी दुपारी १२:५५ वाजता मिरज येथून सुटून, दुसऱ्या दिवशी ९ जुलै रोजी १२:२५ वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे. आरक्षणाची सुरुवात २९ जूनपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि संकेतस्थळावर विशेष शुल्कासह होणार आहे.

या स्थानकांवर असेल थांबा :
या गाडीचे थांबे अरग, सलगरे, कवठे महांकाल, ढालगाव – जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, कुईवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, पंढरगाव, चांदगाव, अकोला, मूर्तिजापूर असे आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now