५ हजाराची लाच घेताना ग्रामसेवकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025 10:31 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी तसेच गट नंबर नमुना आठ मिळवण्यासाठी ५ हजार रुपयाची लाच घेताना भडगाव तालुक्यातील मांडकी येथील ग्रामसेवकासह रोजगार सेवकाला जळगाव एसीबीने रंगेहात अटक केली. सोनिराम धनराज शिरसाठ (वय ४७, रा. पाचोरा, जि. जळगाव) असं ग्रामसेवकाचे नाव असून जितेंद्र लक्ष्मण चौधरी (वय ३८, रा. पाचोरा, जि. जळगाव)असं रोजगार सेवकाचे नाव आहे. या दोघांविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

lach jpg webp

याबाबत असे की, यातील तक्रारदार यांच्या मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी तसेच गट नंबर नमुना आठ मिळवण्यासाठी ग्रामसेवक सोनिराम शिरसाठ आणि रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी यांनी ६ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने २३ जून २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रार मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपींनी ६ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ५ हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, २३ जून २०२५ रोजी सापळा रचण्यात आला. या सापळा कारवाईदरम्यान, आरोपी ग्रामसेवक सोनिराम शिरसाठ आणि रोजगार सेवक जितेंद्र चौधरी यांनी पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम ५ हजार रुपये हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment