जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२५ । महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली असून मात्र अद्यापही जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यात आज सोमवारपासून मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मागच्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण. अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहे. जून महिना संपला आता काहीच दिवस उरले आहे. मात्र जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पावसाने हजेरी लावली नाहीय. त्यामुळे शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

दरम्यान यातच जिल्ह्यात आज सोमवारपासून मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार २५ जूनपर्यंत जिल्ह्यात ५० ते १०० मिमी पाऊस होऊन आर्द्रता आणि उकाड्याच्या पातळीतही बदल होतील. याच काळात मुसळधार पाऊस होऊ शकतो.
दुसरीकडे दिवस व रात्रीच्या तापमानात केवळ सहा अंशांचाच फरक आहे. पारा दिवसा ३१.५ तर रात्री २५.४ अंशांवर आहे. शहरात २३ व २४ जून रोजी विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. वातावरणात आर्द्रता वाढणार आहे. या चार दिवसांत आर्द्रता ६० ते ८० टक्के राहील. २३ ते २५ जून दरम्यान ढगाळ वातावरण व पावसामुळे आर्द्रता वाढेल.
दरम्यान, उत्तर प्रदेश आणि परिसरात सक्रिय असलेले कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू कमकुवत होत आहे. यासोबतच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, पाकिस्तान ते बांगलादेश दरम्यान पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे राज्यातील कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. आज हवामान खात्याने राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा अलर्ट जारी केला.
राज्यात आज कुठे कोणता अलर्ट?
ऑरेंज अलर्ट :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा.
येलो अलर्ट :
पालघर, मुंबई, ठाणे, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.
येलो अलर्ट :
बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर.







