महाराष्ट्रात मान्सून सक्रीय ; आज कुठे कुठे अलर्ट? तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या

जून 15, 2025 10:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२५ । महाराष्ट्रात मान्सून सक्रीय झाला असून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा अलर्ट हवामान खात्यानं दिला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यातही आज जोरदार पावसाचा अलर्ट हवामान खात्यानं दिला आहे. रविवारी आणि सोमवारी कोकणातील सर्वच जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तसेच मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट आहे.

rain 1

मागच्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाचे राज्यातील सर्वच भागात आगमन झाले आहे. हवामान विभागानुसार, राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि मराठवाडा परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या हवामान प्रणालींमुळे राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस घाट विभागात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जळगावातही जोरदार पावसाची शक्यता:
शनिवारी जळगावचे तापमान ३८.५ अंशांपर्यंत होते. सायंकाळी सहा वाजेपासून आकाशात विजा चमकण्यास सुरुवात झाल्याने पावसाची शक्यता जाणवली होती. दरम्यान, आज रविवारी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून कमाल तापमानात काही अंशी घट होण्याची शक्यता आहे.

राज्यात आज कुठे कुठे अलर्ट?
मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) : रत्नागिरी.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : मुंबई, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर.
विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment