जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ । गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेला सुवर्णबाजार सुरू होण्यासह इतरही व्यवहारांना परवानगी मिळाल्यानंतर सोने-चांदी खरेदी पुन्हा वाढू लागला आहे. आज शनिवारी जळगावातील सुवर्णबाजारात सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. आज सोने प्रति १० ग्रम ३२० रुपयाने तर चांदी ७०० रुपयांनी महागली आहे. यामुळे सोन्याचे दर ५० हजाराच्या उंबरठ्यावर आले आहे. तर चांदी ७६ हजाराच्या वर गेले आहे.
आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९७० रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,९७० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७३३ रुपये इतका आहे. तर १० ग्रमसाठी तुम्हाला ४७,३३० रुपये मोजावे लागतील.
चांदीचा भाव
मागील गेल्या काही दिवसापासून चांदीच्या दरात मोठी पडझड दिसून येत आहे. आज चांदीच्या भावात ७०० रुपयाची वाढ होऊन चांदीचा १ किलोचा भाव ७६,८०० रुपये आहे. गेल्या १० दिवसामध्ये चांदीच्या दरात मोठी पडझड दिसून आली आहे.