Chalisagaon : चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट उड्डाण पुलावरून खाली ; दोघे गंभीर जखमी

मे 25, 2025 11:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२५ । चाळीसगाव तालुक्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिलाखेड गावाजवळ मोठा अपघात झाला आहे. वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट उड्डाण पुलावरून खाली कोसळला. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहे.

truck ac

चाळीसगावमधील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिलाखेड गावानजीक असलेल्या उड्डाण पुलावर ट्र्क नियंत्रित झाला. यावेळी चालकाचे ट्र्कवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट उड्डाण पुलावरून खाली कोसळला.


या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करत दोन्ही गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment