चाळीसगावात दोन कारची समोरसमोर धडक ; मालेगावचे दोघे जागीच ठार

मे 19, 2025 10:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव तालुक्यातील पिलखोडजवळ दोन कारची समोरसमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात मालेगावच्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

cl ac

कुसुंबा रोड भागात राहणारे अब्दुल कुडूस मोहंमद इस्माइल हे कारने इतर तिघांसह छत्रपती संभाजीनगर येथे विवाहासाठी जात होते. पिलखोडपासून दोन किलोमीटर अंतरावर समोरुन वेगात आलेल्या कारने त्यांच्या कारला धडक दिली. यात अब्दुल कुडूस व अतीक अहमद अब्दुल खालिक यांचा जागीच मृत्यू झाला. चालक फरान व अल्ताफ अनाजवाला हे दोघे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह मालेगाव सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. दोघा जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. कारमधील काही जण जखमी असून त्यांच्यावर चाळीसगावला उपचार सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment