दहावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट ; कधी लागणार निकाल?

मे 8, 2025 10:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२५ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यानंतर आता दहावीचा रिझल्ट कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे. अशातच दहावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

HSC Results 2022

बारावीचा निकाल लागल्यानंतर दहा दिवसात दहावीचादेखील निकाल जाहीर करु असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरच दहावीचा निकाल लागणार आहे. पुढच्या आठवड्यात १५ तारखेपर्यंत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. याबाबत बोर्डाने अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, बारावीच्या निकालानंतर १० दिवसात दहावीचा रिझल्ट जाहीर करु असं सांगितलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

दहावीचा निकाल कसा चेक कराल?
दहावीचा निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने वेबसाइटवर जाऊन चेक करु शकतात.
mahahsscboard.in
mahresult.nic.in
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in या वेबसाइटवर जाऊन रिझल्ट पाहू शकतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment