उद्या लागणार 12वीचा निकाल ; कुठे आणि कसा चेक कराल रिझल्ट?

मे 4, 2025 6:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०२५ महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची वाट पहाट असलेल्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बारावीचा निकाल उद्या म्हणजेच ५ मे रोजी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहयला मिळेल. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली.

ssc hsc result jpg webp

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामध्ये ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली व ३७ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

बारावीची परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. दरम्यान आज बारावीच्या निकालाची तारीख राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केली.

निकाल कुठे पाहाल –
१. https://results.digilocker.gov.in
२. https://mahahsscboard.in
३. http://hscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com

कसा चेक कराल निकाल?
– विद्यार्थ्यांनी सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जावे.
– होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करावे.
– क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे अचूक नाव टाका. त्यानंतर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.
– हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment