सामाजिक न्याय विभागाच्या नागरिकाभिमुख उपक्रमांत आणखी एक पाऊल ; ही सेवा आता WhatsApp वर उपलब्ध

एप्रिल 26, 2025 2:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२५ । नागरिकांना विविध सेवा सुलभ, पारदर्शक व त्वरित मिळाव्यात यासाठी समाज कल्याण विभाग, जळगाव यांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे. सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) योगेश पाटील यांच्या पुढाकाराने “आपला सहायक” ही सेवा आता WhatsApp वर सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण करण्यात आले.

whatsapp chat jpg webp

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, ही सेवा नागरिकांसाठी अधिक सोयीस्कर बनवण्यात आली असून, WhatsApp च्या माध्यमातून विविध शासकीय सेवा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. नागरिक खालील सुविधा सहज घेऊ शकतात :

विविध योजनांकरिता अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची माहिती
तक्रार नोंदणी व स्थितीची माहिती
“आपला सहायक ” सेवा 9423184567 या WhatsApp क्रमांकावर उपलब्ध आहे. ही सेवा २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस कार्यरत राहणार असून, नागरिकांच्या कामकाजात गती व पारदर्शकता आणण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

“आपला सहायक – तुमचा विश्वासू डिजिटल सहायक” या संकल्पनेतून नागरिकांच्या सेवेचा नवा अध्याय सुरु झाला आहे, असे सहायक आयुक्त श्री. योगेश पाटील यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment