जळगावात अवैध गावठी दारूभट्ट्या उध्वस्त ; लाखोंच्या मुद्देमालासह 27 जण ताब्यात

मार्च 18, 2025 5:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अवैध दारूविक्री आणि हातभट्टी दारू निर्मिती विरोधात मोहीम राबवित कारवाई केली. कंजरवाडा, तांबापूर आणि शिरसोली येथे ही कारवाई झाली असून या कारवाईत 27 जणांना ताब्यात घेण्यात आले असून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे .

avaidh daru

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

ही कारवाई जळगाव शहरातील कंजरवाडा तसेच ग्रामीण भागातील शिरसोली आणि तांबापूर येथे पहाटे राबवण्यात आली. पोलीस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करून गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर धाड टाकली. या कारवाईदरम्यान 10 हजार लीटर दारू तयार करण्याचे रसायन, कच्चा माल आणि एकूण 7 लाख 1 हजार 620 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीसांच्या पथकाने संपूर्ण गावठी हातभट्टी दारू नष्ट केली आहे.

ताब्यात घेतलेल्या 27 आरोपींवर मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मोहिमेत 11 पोलीस अधिकारी, 48 पोलीस अंमलदार, 22 होमगार्ड तसेच आरसीपी आणि क्युआरटी पथकाने सहभाग घेतला. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment