Jalgaon : मध्यरात्री २३ वर्षीय तरुणाने उचललं नको ते पाऊल..

मार्च 8, 2025 5:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२५ । जळगाव शहरातील सिंधी कॉलनीमधील २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ८ मार्च रोजी मध्यरात्री उघडकीस आली. विजय उर्फ सनी मनोज छाबडिया (वय २३, रा.सिंधी कॉलनी, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

sani chhabadi

विजय उर्फ सनी मनोज छाबडिया हा जळगावातील सिंधी कॉलनीत वडील आणि काका यांचेसह राहत होता. काही महिन्यांपासून तो घरीच होता. शुक्रवारी दि. ७ मार्च रोजी रात्री जेवण झाल्यानंतर तो घरीच होता. दरम्यान शनिवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास त्याने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली.

कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी शेजारच्या नागरिकांच्या मदतीने विजय याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment