जळगावात साडेपाच किलो गांजासह एकाला ठोकल्या बेड्या

मार्च 6, 2025 2:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । शहरातील मेहरुण तलावाच्या परिसरात एमआयडीसी पोलिसांनी गांजाची वाहतूक करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले आहे. मुकेश विष्णू अभंगे (वय ४२, रा. कंजरवाडा, जळगाव) असं अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून साडेपाच किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

kulbhushanpatil firing case arrest

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मेहरुण तलाव परिसरातील जे.के. पार्क भागातील उद्यानात एक व्यक्ती गांजाची वाहतूक करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उद्यानात पाहणी केली असता, एक संशयित व्यक्ती मोटारसायकल जवळ उभा असल्याचे दिसले. पोलिसांनी त्या संशयित व्यक्ती मुकेश विष्णू अभंगे याला ताब्यात घेतलेअसता त्याच्याकडून एका पिशवीत साडेपाच किलो गांजा आढळून आला.

पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक विभागाला बोलावून नमुने तपासले. पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ४० ते ५० हजार रुपये असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment