---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

जळगावकरांनो काळजी घ्या ! आजपासून चार दिवस तापमानाचा पारा वाढणार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२५ । जळगावात आता सूर्य तापू लागला असून तापमानाचा पारा ३५ अंशावर गेल्याने उकाडा जाणवत आहे. दरम्यान आजपासून पुढचे चार दिवसात तापमानाचा पारा वाढणार आहे. जळगावात आज ५ ते ८ मार्च दरम्यान चार दिवसात तापमान ३६ ते ३८ अंशांवर पोहोचू शकते. मंगळवारी शहराचे तापमान ३६ अंशांवर होते. Jalgaon Temperature Today

TP5 March

जागतिक तापमान वाढीचे चटके आता आपल्याला उन्हाळा सुरू होताच जाणवायला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच अनपेक्षित रित्या तापमान ३५ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं. यामुळे जळगावात रात्री आणि पहाटच्या वेळेस गारवा तर दुपारी कडक उन्हाचा चटका बसत होता. परंतु गेल्या काही दिवसात जळगावात किमान आणि कमाल तापमानाचा पारा वाढत असताना दिसत आहे.

---Advertisement---

मंगळवारी जळगावचे कमाल तापमान ३६ अंश तर किमान तापमान १७.२ अंशावर पोहोचले होते. रात्रीच्याही तापमानात वाढ होऊ लागल्याने उकाडा जाणत आहे. पुढील काही दिवस किमान तापमान हे १४ ते १७ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान मात्र ३५ ते ३८ अंशांपर्यंत राहिल. उत्तर-पश्चिम वाऱ्यांच्या बदलत्या दिशांमुळे आणि आसपासच्या भागातून येणाऱ्या कोमट हवेमुळे ढग तयार होत आहेत. परिणामी काहीसे ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. ढगाळ वातावरण असले तरी उष्णता कमी होणार नाही, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment