बडनेरा-नाशिक ट्रेनला कजगावला थांबा मंजूर ; खा. स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश

मार्च 4, 2025 4:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । बडनेरा नाशिक रोड स्पेशल (०१२११/०१२१२) या रेल्वे ट्रेनला कजगाव स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्यामुळे हा थांबा मंजूर करण्यात आला.

memu jpg webp

प्रवाशांना नाशिक व बडनेराकडे प्रवास करण्यासाठी लांबच्या स्थानकांवर जावे लागत होते. या समस्येची दखल घेत खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि कजगाव येथे गाडीला थांबा देण्याची मागणी केली. अखेर थांबा मंजूर केला आहे. रेल्वे प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. या संदर्भात अधिकृत आदेश लवकरच जाहीर करण्यात येणार असून, प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment