जळगावच्या बाजार समितीत गहू, हरभरा खरेदीला सुरुवात ; इतका मिळतोय भाव?

मार्च 4, 2025 3:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२५ । रब्बी हंगामाची काढणी व कापणी सुरु झाली असून, शेतकऱ्यांच्या घरात आता माल यायला सुरुवात झाली आहे. अनेक तालुक्यांमध्ये गहू, हरभऱ्याची काढणीला सुरुवातही झाली आहे. एकीकडे पीकांची काढणी सुरु असताना, दुसरीकडे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रब्बी हंगामातील पीकांचे खरेदी लिलाव प्रक्रिया सुरु झाली आहे.

gahu harbhara

बाजार समितीमध्ये खरेदीला सुरुवात झाली असली तरी रब्बी पीकांना हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे. दोन ते तीन महिन्यांपासून शेतकरी शासकीय तूर खरेदीला सुरुवात होईल अशी अपेक्षा धरुन आहेत.

गव्हाला हमीभावापेक्षा जास्त भाव
१ नवीन गव्हाचीही आवक आता बाजार समितीमध्ये सुरु झाली असून, गव्हाला हमीभावापेक्षा चांगला दर बाजार समितीत मिळत आहे. गव्हाला हमीभाव २ हजार ४२५ रुपये इतका आहे. तर बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा २५० ते ३०० रुपये जादा भाव मिळत आहे. बाजार समितीमध्ये नवीन गव्हाला २७०० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळत आहे. बाजार समितीमध्ये तूर खरेदीही सुरु आहे. मात्र, बाजार समितीमध्येही हमीभावापेक्षा कमी दर तूर उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे.

इतका मिळतोय भाव ?
साधा हरभरा-५ हजार ते ५ हजार ४३५ रुपये
गुलाबी हरभरा-७ हजार ६०० ते १० हजार ५०० रुपये
चिनोरी हरभरा-५९०० ते ६ हजार रुपये
तुर – ६ हजार ६५० ते ६ हजार ७२५
गहू – २७०० रुपये

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment