जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२५ । सोने आणि चांदीमध्ये मोठ्या उसळीनंतर पडझड झाली. बुधवारी जळगावच्या सुवर्णपेठेत सोने दरात प्रति तोळा ५०० रुपयाची घसरण झालीय. तर चांदी दरात देखील एक हजार रुपयाची घसरण दिसून आलीय. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सोने आणि चांदीचे भाव अद्यापही सर्वसामान्यांच्या आवक्या बाहेर आहे. Gold Silver Rate Today

जळगावच्या सराफा बाजारात मंगळवारी २५ फेब्रुवारीला शुद्ध सोन्याचे भाव ८७१०० रुपये तोळा ( जीएसटीसह ८९७१३) तर चांदी ९८००० रुपये किलो होती. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजेच बुधवारी झालेल्या घसरणीनंतर शुद्ध २४ कॅरेट सोन्याचे भाव ८६६०० रुपये (जीएसटीसह ८९१९८) प्रति तोळ्यावर स्थिरावले.
दुसरीकडे चांदीचा दर ९७००० हजार किलोवर आहे.

मनी कंट्रोल वेबसाइटनुसार, सोन्या-चांदीच्या वायदे बाजारात मात्र बुधवारी अस्थिरता दिसून आली तरी रात्री ९ वाजता ४ एप्रिलचे गोल्ड फ्यूचर १२० रुपयांच्या वाढीने ८५७७४ रुपयांवर ट्रेड करत होते. याच वेळेपर्यंत गोल्ड फ्यूचरने ८५९२९ चा उच्चांक तर ८५२१३ चा नीचांक गाठलेला दिसून आला.
भाववाढीचे कारण?
ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर वाढलेला भू-राजकीय तणाव, डॉलरच्या तुलनेत कमकुवत रुपया (८७.१५), वाढती महागाई व शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे. तसेच गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीकडे ओघ वाढला आहे आणि याच्या परिणामाने सोन्याची मागणी आणि पर्यायाने सोन्याचे भाव वाढत आहे. यावर्षी सोन्याचे भाव ९० हजार रु. तोळ्यापर्यंत पोहोचू शकतो असा जाणकारांचा अंदाज आहे.









