जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२५ । पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील (MLA Kishor Patil) यांच्या मातोश्री ग. भा. नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे आज सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 सोमवार रोजी सकाळी 4: 55 वाजता वृद्धपकाळाने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा राहते घर, चिंतामणी कॉलनी भडगाव रोड पाचोरा येथुन दुपारी 3:00 वाजता निघेल. त्यांच्या पश्चात आमदार किशोरआप्पा पाटील, राजेंद्र धनसिंग पाटील, विजय मेघराज पाटील, सुना, नातवंडे असा परिवार आहे.










