एक हजाराची लाच भोवली ; खासगी इसमाला एसीबीने रंगेहात पकडले..

फेब्रुवारी 19, 2025 10:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । आजोबांच्या नावावर असलेला प्लॉटवर वारस लावण्यासह हक्कसोड आणि कर्जाच्या बोजाची नोंद करण्यासाठी, साहेबांकडून काम करुन देण्याच्या मोबदल्यात नगर भूमापन अधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या खासगी इसमाला एक हजाराची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी झाली, अविनाश सदाशिव सनंसे (वय ४९) असे लाचखोर खासगी इसमाचे नाव असून या प्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

lach jpg webp

नेमका प्रकार काय?
तक्रारदार यांच्या जळगाव शहरातील रहिवासी असलेले तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या प्लॉटवर वारस नोंदणी, हक्कसोड प्रक्रिया आणि कर्जाच्या नोंदीसाठी संबंधित नगर भू मापन अधिकारी कार्यालयातील साहेबांकडून काम करून देण्याच्या मोबदल्यात त्याच कार्यालयात काम करणारा खासगी व्यक्ती अविनाश सदाशिव सनंसे (वय ४९) याने लाचेची मागणी केली होती. सुरुवातीला प्रत्येक नोंदणीसाठी ५ हजार रुपये प्रमाणे एकूण १५ हजार रुपये आणि काम सुरू करण्यासाठी १,५०० रुपये मागितले. मात्र तडजोडीनंतर एक हजार रुपयांची रक्कम ठरली.

तक्रारदाराने याबाबत तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने आरोपीला १ हजार रुपये देताच पथकाने अविनाश सनंसे याला रंगेहात पकडले. या प्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now