Gold Rate : जळगाव सुवर्णनगरीत गेल्या दहा दिवसांतच सोने 3200 रुपयांनी महागले, आता पुढे काय?..

फेब्रुवारी 12, 2025 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | १२ फेब्रुवारी २०२५ । सध्या अमेरिकेच्या (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या धोरणांचा परिणाम मौल्यवान धातूंवर झाल्याचं पाहायला मिळत असून यामुळे जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) दराने विक्रम केला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दहाच दिवसात सोने प्रतितोळा ३२०० रुपयांनी महाग झाले आहे. या दहा दिवसांतच सोन्याच्या दरांनी तीन वेळा उच्चांकी दरपातळी गाठली. यातच सोन्याचा दर ९० हजाराचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज बाजारातील जाणकारांनी वर्तविला आहे. Gold Silver Rate Today

gold silver 1 jpg webp

देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचे सोन्यांच्या दरांवर बारकाईने लक्ष असते. एकीकडे लग्नसराईचे दिवस असल्याने सोने आणि चांदीच्या दागिन्यांना मागणी असते. त्यातच दोन्ही धातूंनी विक्रमी पातळी गाठली. सध्या जळगाव सराफ बाजारात सोन्याचे दर एसटी सह ८८ हजार ४०० रुपयांवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर जीएसटीसह ९९ हजार ९०० रुपयांवर पोहोचले आहे.

असे वाढले सोन्याचे दर
डिसेंबर महिन्यात ७६ ते ७७ हजार रुपये तोळा या दरम्यान स्थिर होते. डिसेंबर महिन्यात केवळ २०० रुपयांनी सोने वाढले होते. त्यानंतर नववर्षात अर्थात जानेवारी महिन्यात तीस दिवसांत ५८०० रुपयांची वाढ प्रतितोळा झाली. तर सध्या सुरू असलेल्या फेब्रुवारीच्या दहा दिवसांतच ३२०० रुपयांनी सोने महागले आहे. त्यात येत्या दोन आठवड्यात आणखी वाढ होईल.

फेब्रुवारीमधील विक्रम
जानेवारीत सोन्याने तब्बल ५८०० रुपयांचा फायदा गुंतवणूकदारांना मिळवून दिला आहे. फेब्रुवारी महिन्यात पहिल्या दहा दिवसातील ५, ६ व ८ फेब्रुवारी हे तीन दिवस वगळता सातही दिवसांत सोन्याच्या दराने दररोज विक्रमी पातळी गाठली आहे. अवघ्या दहा दिवसांत सोने ३२०० रुपयांनी वाढले आहे. सध्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर हे आतापर्यंतचे बाजाराच्या इतिहासातले विक्रमी दर असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

लवकरच नवीन विक्रम
सध्या सोना चांदीच्या विक्रमी दरामुळे सोन्या चांदीची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेली असून सराफ बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. येत्या काळात सोन्याचा दर ९० हजाराचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now