---Advertisement---
जळगाव जिल्हा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शेळगावात जल्लोषात नागरिक सत्कार संपन्न !

shelgaon gp
---Advertisement---

जनतेच्या आशीर्वादानेच या पदापर्यंत पोहोचलो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

shelgaon gp

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२५ । जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसून ही जनतेशी जोडलेली नाळ मी कधीही तुटू देणार नाही. गावातील पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देवून शेळगावच्या विकासात कोणतीही कमतरता राहणार नाही,” असे आश्वासन देत “जनतेच्या आशीर्वादाने आणि मतदारसंघाशी असलेल्या निष्ठेमुळेच मी या पदापर्यंत पोहोचलो असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते शेळगाव येथे नागरी सत्कार प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते श्रीराम मंदिरापासून गावांतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे लोकार्पण करण्यात आले.

---Advertisement---

जळगाव तालुक्यातील शेळगाव येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचा नागरिक सत्कार मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार केला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत गावभर जल्लोषाचे वातावरण होते. नागरिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत व जल्लोषात त्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक कुणाल पवार यांनी केले. प्रास्ताविक विस्तार अधिकारी विजय पवार यांनी केले तर आभार शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र सपकाळे यांनी मानले. या सोहळ्याला, सरपंच संजय कोळी, उपसरपंच गणेश पाटील, सोसायटी चेअरमन अशोक पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र सपकाळे माजी सरपंच हरीश कोळी, माजी पं. स. सदस्य मिलिंद चौधरी, युवराज कोळी, तुषार महाजन, हरिष भोळे, रविंद्र चव्हाण सर, पिंटू कोळी, अजय महाजन, प्रशांत पाटील, ग्रा.पं. सदस्य सत्यभान तायडे, संचालक गलू पाटील, भूषण पाटील, बंडू पाटील यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध संस्थांचे सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---