शेतात फवारणी करतांना विषबाधा झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू ; जळगाव तालुक्यातील घटना

फेब्रुवारी 6, 2025 6:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२५ । जळगाव तालुक्यातील धामणगाव येथे एक दुर्दैवी घटना घडलीय. ज्यामध्ये शेतात फवारणी करतांना विषबाधा झालेल्या किशोर अभिमन तायडे (वय ५२ रा. धामणगाव ता.जळगाव) यांचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान आज गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

crime death 1 jpg webp

याबाबत असे की, धामणगावात किशोर तायडे हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होतो. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ते शेतात पिकांवर फवारणी करत असतांना त्यांना विषबाधा झाली. या विषबाधामुळे त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

त्यांच्यावर उचार सुरू असतांना गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालविली. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालयात आक्रोश केला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात आई मिराबाई, पत्नी बेबाबाई, ललित आणि जयवंत ही दोन मुले, भाऊ राजू असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now