---Advertisement---
जळगाव जिल्हा

नेत्रकुंभातून डॉ. आर्विकर करताय संतसेवा

dr. arvikar
---Advertisement---

श्रीक्षेत्र प्रयागराज येथील महाकुंभमेळयात नेत्रशिबिरात संधी

dr. arvikar

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव श्रीक्षेत्र प्रयागराज येथील महाकुंभमेळयात जावून आपला जन्म सत्कारणी लागावा असे अनेकांना वाटते पण इच्छा असून सफल होत नाही. करोडो नागरिकांसह साधुसंत देखील या पावन भूमीत वास्तव्य करून आहे. यासाठी देशातील अनेक तज्ञ डॉक्टर देखिल सेवेसाठी नेत्रशिबिरात नेत्रकुंभातून साधुसंताची तपासणी करत आहे.

---Advertisement---

देशातील मोजक्याच तज्ञांची यासाठी निवड झाली असून जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे वैद्यकिय संचालक प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉॅ. एन एस आर्विकर यांची देखिल निवड करण्यात आली. येथे नेत्रकुंभात नेत्रशिबिराच्या माध्यमातून आलेल्या नागरिकांची नेत्रतपासणी व उपचार हे तज्ञ करीत आहे.डॉ. आर्विकर हे दि ६ ते १० फेबु्रवारीपर्यंत साधुसंताची नेत्रतपासणी व उपचार करणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---